Ajit Pawar : 'मी दूधखुळा नाही, मला शिकवू नका', शरद पवारांबद्दलच्या प्रश्नावर अजित पवार चांगलेच भडकले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

Ajit Pawar : 'मी दूधखुळा नाही, मला शिकवू नका', शरद पवारांबद्दलच्या प्रश्नावर अजित पवार चांगलेच भडकले

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार कायमच आक्रमक आणि कठोर भूमिका घेताना दिसतात. परंतु हिवाळी अधिवेशन सुरू असताना गोंधळ केल्याप्रकरणी आणि असंसदीय शब्द वापरला म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर कारवाई केली त्यानंतर मात्र अजित पवार संयमी भूमिका घेताना दिसून आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अधिवेशनाच्या सभागृहात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबद्दल असंसदीय शब्द वापरला म्हणून जयंत पाटील यांच्यावर अधिवेशन संपेपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर अजित पवारांनी संयम दाखवला. या घटनेनंतर अजित पवार यांच्या या संयमी भूमिकेवर शरद पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. शरद पवारांच्या या नाराजीच्या चर्चेसंबधी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा: Maharashtra Politics: जयंत पाटलांच्या निलंबनानंतर पवार ऍक्शन मोडमध्ये; अजित पवारांना केला फोन अन्...

शरद पवार यांच्या नाराजीवर बोलताना अजित पवार म्हणाले की , 'शरद पवार नाराज आहेत हे धांदात खोटं आहे. हे तुम्हाला हे कोणी सांगितलं. शरद पवार यांनी फोन करून सांगितलं आहे का? तुम्ही पत्रकार आहात, तुम्हाला विचारण्याचा अधिकार आहे'. तसेच, 'मी रोज साहेबांच्या संपर्कात असतो. तुमच्या ज्ञानात कोणी अशी भर घातली? असा आक्रमक प्रश्नही अजित पवार यांनी पत्रकारांना केला आहे.

हेही वाचा: Jaykumar Gore : गोरेंच्या वडिलांकडून घातपाताचा संशय; उपस्थित केले महत्त्वाचे मुद्दे

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, 'तुम्हाला ब्रेकींग न्यूज मिळत नाही. म्हणून तुम्ही अशा बातम्या पसरवता. लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करता. मी विरोधी पक्षनेता आहे मला माझं काम कळतं. मी दूधखुळा नाही. मी ३२ वर्षांपासून राजकारण समाजकारण करणारा माणूस आहे. त्याच्यावरून माझी काळजी करू नका, असंही पवार यावेळी म्हणाले आहेत.

हेही वाचा: Devendra Fadanvis: 'देवेंद्र फडणवीसजी, जास्त बोलाल तर उपमुख्यमंत्रीपदही जाईल', भाजप नेत्याचा घरचा आहेर

टॅग्स :Sharad PawarAjit Pawar