कोरोना चाचणीसाठी महाराष्ट्रातील सहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये साधनसामुग्री उपलब्ध

कोरोना चाचणीसाठी महाराष्ट्रातील सहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये साधनसामुग्री उपलब्ध

मुंबई - कोरोनाच्या चाचणीसाठी महाराष्ट्रातील सहा ठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यंत्रसामुग्री उपलब्ध झाली असून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) त्याला तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी देशांतील आरोग्यमंत्र्यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी महाराष्ट्रासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी यावेळी केली. यावेळी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. अनुपकुमार यादव आदी उपस्थित होते. 

Coronavirus: कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी राजकीय पक्ष सरसावले 

महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा आणि आरोग्य विभागाच्या कामगिरीबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.

राज्याच्या एकंदरीत परिस्थितीची माहिती देतांना आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले की, राज्यात कोरोनाला प्रतिबंधासाठी केंद्राच्या सूचनेनुसार कार्यवाही केली जात आहे. राज्यात आतापर्यंत 18 कोरोनाबाधीतांना घरी देखील सोडण्यात आले आहे. सध्या कोरोना चाचणीसुविधा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विस्तारण्यास सुरूवात झाली आहे. त्यासाठी आवश्यक ती यंत्रसामुग्री देखील उपलब्ध आहे मात्र ह्या ठिकाणी चाचणी सुरू करण्यासाठी आयसीएमआरकडून परवानगी मिळणे गरजेचे आहे. ही परवानगी तातडीने द्यावी जेणेकरून धुळे, अकोला, औंगाबाद, सोलापूर, मिरज, नागपूर याठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये चाचण्या करता येतील, असे श्री. टोपे यांनी सांगितले.

कोरोना प्रतिबंधासाठी अत्यावश्यक वैद्यकीय संसाधने जशी एन 95 मास्क, ट्रीपल लेअर मास्क, पीपीई, व्हेटीलेटर याची आवश्यक ती उपलब्धता राज्यात आहे. मात्र आपात्कालीन परिस्थिती ओढावल्यास भविष्यकालीन तरतूद म्हणून या अत्यावश्यक वैद्यकीय साधनासामुग्रीची पूर्तता केंद्र शासनाने करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com