Coronavirus: कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी राजकीय पक्ष सरसावले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

भारतीय जनता पक्षाने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने नऊ गरीब परिवार दत्तक घेण्याचा निर्णय महाराष्ट्रात घेतला आहे.

मुंबई : कोरोनाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असतानाच राजकीय पक्षही आता कामाला लागले आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय जनता पक्षाने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने नऊ गरीब परिवार दत्तक घेण्याचा निर्णय महाराष्ट्रात घेतला आहे. गरीब आणि गरजूंना मदत मिळालीच पाहिजे असे आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ऑडिओ ब्रीजव्दारे घेतलेल्या बैठकीत स्पष्ट केले.

coronavirus: जुन्नरला १२ हजार जणांना होम क्वारंटाइनची सूचना

गरीब कुटुंबे या काळात उपासमारीची शिकार होंणार नाहीत यासाठी विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. घरकाम करणाऱ्या महिला राजंदारीवरचे मजूर यांच्याकडे लक्ष दिले जाईल. सध्या रूग्णालयात असलेल्या पण घरी जाण्याचे सांगण्यात आलेल्या रूग्णांसाठी कोणतीही वाहतूक व्यवस्था नाही. या रूग्णांना विशेषत: बाळ बाळंतिणींना घरी पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी स्वत:ची तब्येत सांभाळून हाती घ्यावे असेही ठरले. संचारबंदीच्या आदेशांमुळे डॉक्‍टरांचे दवाखाने बंद आहेत. यामुळे गैरसोय होणाऱ्या नागरिकांसाठी आता पर्यायी व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. भाजप या कामात पुढाकार घेईल. मंगलकार्यालये ताब्यात घेवून तेथे योग्य ती काळजी घेत स्वयंपाक तयार करावा, तो गरजूंना पोहोचवावा अशी योजनाही आखण्यात येणार आहे. बंदोवस्तात अडकलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तसेच आहारव्यवस्था उभी करणे, किराणा दुकानात सुरक्षित अंतर राखण्यास सांगणे अशा योजनाही सुरू करण्यात येतील. 

आज भाजपने ऑडिओब्रिजच्या माध्यमातून घेतलेल्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, संघटनमंत्री विजय पुराणिक उपस्थित होते. 

सेनेची वैद्यकीय केंद्रे 
दवाखाने बंद असल्याने अडलेल्या रूग्णांना मदत करण्यासाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने वैद्यकीय सुविधा सुरू केल्या आहेत. जनता दलाने गरीब रूग्णांची नि:शुल्क कोरोना चाचणी त्यांनी मागणी केल्यास करून देण्यात यावी असे सुचवले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The political party ready to fight the Corona virus