Tukaram Mundhe FDA Action Pune : भेसळखोरांचे धाबे दणाणले! अन्न नमुन्यांचे अहवाल आता १४ दिवसांत येणार; जिममधील 'प्रोटीन पावडर' विक्रीवरही तुकाराम मुंढेंचा कडक इशारा

पूर्वी ६ महिन्यांपर्यंत लागणारा तपासणी कालावधी २० दिवसांवर आणला असून महिन्याभरात तो १४ दिवसांवर येणार; नियम मोडणाऱ्या व्यावसायिकांचे परवाने थेट रद्द करण्याचा इशारा.
"FDA keeps strict watch on those selling protein powder in gyms."

"FDA keeps strict watch on those selling protein powder in gyms."

Sakal

Updated on: 

राज्यात भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाची (FDA) धडक मोहीम सुरू असतानाच, आता नमुना तपासणीचे अहवाल अत्यंत जलदगतीने मिळणार आहेत. प्रयोगशाळांची क्षमता वाढवल्यामुळे पूर्वी ३० दिवस ते सहा महिने लागणारा कालावधी आता २० दिवसांवर आला असून, येत्या महिन्याभरात तो १४ दिवसांपर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती ‘एफडीए’चे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी दिली.

Loading content, please wait...