MPSC Exam: 'एमपीएससी'चं चाललंय काय? अपात्र उमेदवारांमुळे पात्र उमेदवारांवर अन्याय; माहिती व जनसंपर्क विभागाची भरती प्रक्रिया कासवगतीने

MPSC DGIPR Recruitment 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या भूमिकेमुळे पात्र उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण असून, मुलाखतीसाठी अपात्र ठरविण्यात आलेल्या उमेदवारांशी संबंधित न्यायालयीन प्रकरणामुळे पात्र उमेदवारांना विलंबाचा फटका बसत आहे.
DGIPR Recruitment

DGIPR Recruitment

esakal

Updated on

MPSC DGIPR 2022 recruitment recommendations remain pending despite provisional merit list: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) एकीकडे भरती प्रक्रिया अधिक वेगवान करण्यासाठी ऑनलाइन परीक्षांची घोषणा करत असताना, दुसरीकडे 2022 मधील माहिती व जनसंपर्क विभागाच्या भरती प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. 2025 मध्ये ऑनलाइन परीक्षा पार पडल्यानंतर जून-जुलै 2026 मध्ये मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखतीनंतर तात्पुरती गुणवत्ता यादी (Provisional Merit List) जाहीर करण्यात आली असली, तरी अद्याप शिफारस (Recommendation) प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com