

MSRTC Makes NCMC Card Mandatory for Concession Travel
esakal
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) बसेमध्ये भाडे सवलतीचा फायदा घेणाऱ्या प्रवाशांसाठी १ ऑगस्टपासून ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) अनिवार्य करण्यात आले आहे. या नव्या नियमाची अंमलबजावणी प्रथम महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ या श्रेणीतील प्रवाशांवर होईल. नंतर हा नियम टप्प्याटप्प्याने इतर सवलत श्रेणींमध्येही विस्तारित करण्यात येईल.