MSRTC Workers Announce Protest Over Pending Demands
esakal
नागपूर : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी संयुक्त कृती समितीने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १५ जूनपासून तीन टप्प्यांत निदर्शन होतील, तर २९ जूनपासून राज्यभर बेमुदत धरणे आंदोलन केले जाणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवरून पुन्हा एकदा तीव्र आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता आहे. गुरुवारी मुंबईत पार पडलेल्या बहुसंख्य एसटी कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या बैठकीत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.