समुद्रकिनारी असूनही मुंबईची हवा दिल्लीपेक्षा खराब; हायकोर्टाने दिले प्रदूषण रोखण्यासाठी कडक आदेश

Bombay High Court Cracker Ban : मुंबई महानगर क्षेत्रातील प्रदूषणाचा अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने रस्त्यांवरील धुळीचा प्रश्न गंभीर असल्याचंही न्यायालयानं म्हटले आहे.
Mumbai Air Pollution

Mumbai Air Pollution

esakal

Updated on: 

देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील प्रदूषणाचा प्रश्न आता गंभीर बनला आहे. समुद्रकिनारी वसलेले शहर असूनही मुंबईची हवा दिल्लीपेक्षाही खराब होत असल्याचे निरीक्षण बॉम्बे हायकोर्टाने नोंदवले आहे. यावर न्यायालयाने आश्चर्य व्यक्त करत राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला प्रदूषण रोखण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

Loading content, please wait...