"दाभोळकरांच्या हत्येत सहभागी संघटनांकडून आदित्य ठाकरेंना धमकीचा संशय"

आदित्य ठाकरेंना मेसेज करून धमकी देण्यात आली होती.
Nawab Malik
Nawab Malik sakal media

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे पुत्र आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना आलेल्या धमकीच्या फोननंतर खळबळ माजली आहे. या प्रकरणात पोलिसांनी बंगळुरूमधून एका नागरिकाला अटक केली आहे. त्यातच आता राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी (Nawab Malik) एक खळबळजनक दावा केला आहे.

Nawab Malik
मुस्लिमांना नोकरी आणि शिक्षणात ५ टक्के आरक्षण विचाराधीन - नवाब मलिक

ज्या पद्धतीनं आदित्य ठाकरे यांना धमकीचं पत्र आलं, त्यावरून ते नरेंद्र दाभोलकर (Narendra Dabholkar) आणि गोविंद पानसरे यांची हत्या करणाऱ्या संघटनांशी त्याचा संबंध असल्याचा संशय आहे असं नवाब मलिक म्हणाले आहेत. तसंच आपल्यालाही अशा धमक्या आल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रकरणात आम्ही त्यांच्या चौकशीची मागणी केल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

Nawab Malik
नितेश राणे यांचे ट्विटर अकाऊंट बंद करा; शिवसेना आक्रमक

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना जीवे मारणारी धमकी देणाऱ्या आरोपीला गजाआड करण्यात आलं आहे. या प्रकरणात मुंबई क्राईम ब्रांचच्या सायबर सेलने जयसिंग राजपूत नावाच्या व्यक्तीला बंगळुरूहुन अटक केली आहे. राजपूत हा स्वतः अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा फॅन असल्यातं समजतं आहे. आठ डिसेंबरच्या रात्री राजपूतने आदित्य ठाकरेंना यांना फोन केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com