Maharashtra Corona Update
Maharashtra Corona UpdateSakal Media

राज्यात तिसरी लाट दोन-चार आठवड्यांतच धडकेल: टास्क फोर्स

Published on

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट अद्यापही संपलेली नाहीये. मात्र, इतक्यातच आता नव्या संकटाची चाहूल लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोनासाठी तयार झालेल्या टास्क फोर्सने इशारा दिला आहे की, ज्या प्रकारे गेल्या तीन दिवसांपासून बाहेर गर्दी दिसून येत आहे, ते पाहता असे संकेत मिळत आहेत की, पुढच्या दोन ते चार आठवड्यांमध्येच कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्र आणि मुंबईवर आक्रमण करु शकते. मात्र, असं देखील सांगण्यात आलंय की, ही लाट लहान मुलांवर तितका परिणाम करणार नाही जितका परिणाम निम्न मध्यम वयाच्या लोकांवर करेल जे अद्याप या लाटेच्या तडाख्यात सापडले नाहीयेत.

Maharashtra Corona Update
मुंबई: मुख्याध्यापक असावे तर असे, शाळा चालवण्यासाठी संपवली बचत

उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली बैठक

बुधवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भातील बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. त्याचवेळी टास्क फोर्सने या तिसऱ्या लाटेसंदर्भात भविष्यवाणी केली आहे. या बैठकीत टास्क फोर्सचे सदस्य, राज्याचे आरोग्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सामील होते. या बैठकीत, सध्याच्या आकडेवारीनुसार, तिसऱ्या लाटेमध्ये एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही दुसऱ्या लाटेच्या तुलनेत दुप्पट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Maharashtra Corona Update
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार;जिल्ह्यातील 31 बंधारे पाण्याखाली; पाहा व्हिडिओ

बेसावध राहिलो तर तिसरी लाट येणारच

बैठकीत असं देखील सांगण्यात आलंय की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत 19 लाख प्रकरणे समोर आली होती, जी आता दुसऱ्या लाटेत दुप्पट होऊन तब्बल 40 लाख झाले आहेत. टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी म्हटलंय की, दुसऱ्या लाटेचा धोका कमी झाल्यानंतरच्या चार आठवड्यांतच ब्रिटनला तिसऱ्या लाटेला सामना करावा लागतो आहे. जर आपण सावधान राहिलो नाही आणि कोरोना टाळण्यासाठीचे नियम पाळले गेले नाहीत तर आपण देखील त्याच परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो.

महाराष्ट्रात सध्या सुरुय अनलॉक

गेल्या दोन आठवड्यांदरम्यान राज्य सरकारने आठवड्याचा पॉझीटीव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेड्सच्या उपलब्धतेनुसार पाच-स्तरिय अनलॉकची प्रक्रिया लागू केली आहे. सध्याच्या या प्रक्रियेनुसार, 15 हून अधिक जिल्हे आणि नागपूर आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये सूट दिली गेली आहे. या दरम्यान, अनियंत्रित गर्दी, कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करणे, सध्या चिंतेचं कारण मानलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com