Aata Vel Zaali Trailer: "कृष्णानं जेव्हा ठरवलं की त्याच्या मृत्यूची वेळ आलीये..."; 'आता वेळ झाली' चा भावूक करणारा ट्रेलर रिलीज

Aata Vel Zaali Trailer Out: 'आता वेळ झाली' या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Aata Vel Zaali Trailer Out
Aata Vel Zaali Trailer Out

Aata Vel Zaali Trailer Out: सध्या विविध विषयांवर आधारित असणारे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. कॉमेडी, ड्रामा आणि थ्रिलर चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. आता एक भावनिक करणारा विषय घेऊन अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) आणि अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) हे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांच्या 'आता वेळ झाली' (Aata Vel Zaali) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

'आता वेळ झाली' या चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरुवातीला दिलीप प्रभावळकर हे शशिधर लेले या 70 वर्षांच्या व्यक्तीच्या भूमिकेत दिसत आहेत. रोहिणी हट्टंगडी या रंजना लेले यांच्या भूमिकेत दिसत आहेत. शशिधर लेले हे राष्ट्रपतींकडे एक मागणी करतात. ती मागणी अशी असते की, रंजना लेले आणि शशिधर यांना मृत्यूदंड मिळावा.

ट्रेलरमधील डायलॉगनं वेधलं लक्ष

"तुम्ही गीता वाचली नाहीये का? कृष्णानं जेव्हा ठरवलं की त्याच्या मृत्यूची वेळ आली आहे तेव्हा त्याने अरण्यात जाऊन स्वतःची शिकार करून घेतली." हा शशिधर लेले यांचा डायलॉग देखील ट्रेलरमध्ये ऐकू येतो.

सोशल मीडियावर 'आता वेळ झाली' या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करण्यात आला आहे. या ट्रेलरला कॅप्शन देण्यात आलं, "आपण सन्मानाने का मरू शकत नाही?" सोशल मीडियावर अनेक जण या ट्रेलरचं कौतुक करत आहेत.

पाहा ट्रेलर:

Aata Vel Zaali Trailer Out
Maharashtra Shahir: बहुचर्चित ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमाचा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर; कधी आणि कुठे पाहू शकता चित्रपट? जाणून घ्या...

कधी रिलीज होणार चित्रपट?

भाग्यश्री लिमये, शिवराज वायचळ, जयवंत वाडकर, भरत दाभोळकर आणि अभिनव पाटेकर, गुरु ठाकूर हे कलाकार देखील 'आता वेळ झाली' या चित्रपटात काम करणार आहेत. हा चित्रपट 23 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com