

परभणी : विविध विकासकामे आणि योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात शनिवारी (ता. २६) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय आढावा बैठक होणार आहे. या बैठकीत रखडलेली कामे, नियोजनातील त्रुटी, शहरातील अर्धवट प्रकल्पांवरून उपमुख्यमंत्री पवार थेट प्रश्न विचारणार असल्याची माहिती आहे.