Anjali Tuplondhe
sakal
कायगाव - नातेवाईकांना भेटून इलेक्ट्रिक स्कूटीवरून गंगापूरकडे परतणाऱ्या २६ वर्षीय अंगणवाडी सेविकेचा ट्रॅक्टरच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. २३) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास वैजापूर-गंगापूर मार्गावरील मुददेशवाडगाव फाट्याजवळ घडली. मृत्यूपूर्वी तिने सकाळी ११ वाजता पदवीधर मतदारसंघासाठी मतदान केले होते.