Beed Accident Case : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! रस्त्यावरील खड्ड्यामुळे कार हवेत उसळली अन् एसटीवर आदळली; ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Majalgaon Shindewadi Phata accident : बीडमधील माजलगावजवळ शिंदेवाडी फाट्यावर कार आणि एसटी बसच्या धडकेत पाच तरुणांचा मृत्यू झाला. रस्त्याच्या कथित निकृष्ट कामाप्रकरणी डीबीएल ठेकेदार आणि संबंधित अभियंत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Beed Accident Case

Beed Accident Case

esakal

Updated on: 

बीड : माजलगाव हद्दीतील शिंदेवाडी फाट्याजवळ रविवारी (ता. १८) झालेल्या भीषण अपघातात पाच तरुणांचा मृत्यू (Majalgaon Shindewadi Phata accident) झाला. खामगाव-पंढरपूर सिमेंट महामार्गावरील रस्त्याचे निकृष्ट काम आणि खड्ड्यांमुळे कार अनियंत्रित होऊन समोरून येणाऱ्या एसटी बसला धडकली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी दिलीप बिल्डकॉन (डीबीएल) कंपनीच्या ठेकेदारासह संबंधित अभियंत्याविरुद्ध माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com