A fire gutted Shivkrupa Trading Company's shop at Pachpimpali Phata in Biloli, destroying stored agricultural produce and other goods.
esakal
बिलोली,: तालुक्यातील पाचपिंपळी फाटा येथील शिवकृपा ट्रेडिंग कंपनी या अडत दुकानाला शनिवारी (ता. २१) मध्यरात्रीनंतर शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत साठवून ठेवलेला शेतमाल, रोख रक्कम आणि दुकानातील साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत व्यापाऱ्याचे अंदाजे ३० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, शेजारील व्यक्तीच्या सतर्कतेमुळे दुकानाशेजारील शटरमध्ये झोपलेल्या तरुणाचे प्राण वाचले.