

Chhatrapati Sambhajinagar
esakal
छत्रपती संभाजीनगर: शहराची तहान भागवणाऱ्या मुख्य आणि उपमुख्य जलवाहिन्यांवरच पाणी चोरांनी दरोडा टाकला. शहरातील मुख्य जलवाहिन्यांवर २५ हजार अनधिकृत नळ कनेक्शन असल्याचा प्राथमिक अंदाज महापालिकेने वर्तवला. अधिकृत कर भरणाऱ्या नागरिकांचा गळा आवळणाऱ्या या २५ हजार अनधिकृत नळजोडण्यांचे तातडीने सर्वेक्षण करून ते त्वरित खंडित करण्याचे आदेश महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांनी सोमवारी (ता. २५) दिले.