

Chhatrapati Sambhajinagar
esakal
सिल्लोड: तालुक्यातील चिंचवन येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, ग्रामस्थांवर वणवण करण्याची वेळ आली. एवढेच नाही, तर काहीजण जनावरांच्या हौदातील पाणी चोरून-लपून आणत आहेत. असे असताना या गावासह सहा गावांतील टँकरच्या प्रस्तावावर तहसीलदारांनी शनिवारपर्यंत (ता. ११) सही केली नव्हती. याबाबत
‘सकाळ’ने रविवारी (ता. १२) वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल घेत प्रस्तावाच्या मंजुरीची वाट न बघता गटविकास अधिकाऱ्यांनी चिंचवन येथे टँकर पाठवला. त्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला.