कर्ज घेताना सावधगिरी आवश्यक

कर्ज घेताना सावधगिरी आवश्यक
Published on: 
((व्यवहार बँकेचे)) ---- मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेताना बाळगा सावधगिरी ---- आजच्या काळात घर, व्यवसाय, शिक्षण किंवा इतर आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक जण बँकांकडून कर्ज घेतात. अनेकदा मोठ्या रकमेचे कर्ज मिळविण्यासाठी स्वतःची मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवली जाते. मात्र, कर्ज घेताना केवळ मिळणाऱ्या रकमेचा विचार न करता त्यासोबत येणाऱ्या कायदेशीर जबाबदाऱ्यांची जाणीव असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. --- कोणती काळजी घ्यावी? कर्जदाराने कर्जाची रक्कम, व्याजदर, कर्जाचा कालावधी, मासिक हप्ता (ईएमआय), विलंब शुल्क आणि इतर अटींचा सखोल अभ्यास करावा. कर्ज करार न वाचता किंवा अटी समजून न घेता स्वाक्षरी करू नये. मालमत्तेची मालकी, मूळ कागदपत्रे, आधीचे कर्ज किंवा इतर बोजे यांची तपासणी करून आवश्यकतेनुसार कायदेशीर सल्ला घ्यावा. तसेच, नियमित उत्पन्न आणि भविष्यातील आर्थिक गरजा लक्षात घेऊनच कर्जाची रक्कम निश्चित करावी. ---- कर्जाची परतफेड ही कायदेशीर जबाबदारी कर्ज मंजूर झाल्यानंतर करारानुसार वेळेवर हप्ते भरणे, ही कर्जदाराची महत्त्वाची जबाबदारी असते. आर्थिक अडचणीमुळे हप्ते थकल्यास व्याज व इतर लागू शुल्क वाढू शकतात आणि कर्जदाराच्या पतमाहितीवरही परिणाम होऊ शकतो. सुरक्षिततेसाठी मालमत्ता गहाण ठेवलेली असल्यास, लागू कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून बँकेला त्या मालमत्तेविरुद्ध वसुलीची कारवाई करण्याचा अधिकार प्राप्त होऊ शकतो. त्यामुळे केवळ मालमत्ता गहाण ठेवली आहे, म्हणून परतफेडीकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. मात्र, कर्जदार आर्थिक अडचणीत असल्यास त्याने बँकेशी वेळेत संपर्क साधून उपलब्ध पर्याय, पुनर्रचना किंवा तडजोडीबाबत चर्चा करावी. कोणतीही तडजोड लेखी स्वरूपात निश्चित करून तिच्या अटींचे पालन करावे. कर्जाची संपूर्ण परतफेड झाल्यानंतर कर्ज खाते बंद झाल्याची खात्री करून मूळ मालमत्ता कागदपत्रे आणि गहाण नोंदींबाबत आवश्यक कार्यवाही पूर्ण करून घ्यावी. कर्ज घेणे हा आर्थिक प्रगतीचा मार्ग असू शकतो, पण योग्य नियोजनाशिवाय घेतलेले कर्ज आर्थिक संकट निर्माण करू शकते. म्हणूनच, कर्ज घेताना जागरूक राहणे, करार समजून घेणे आणि परतफेडीची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे, हीच सुरक्षित आर्थिक व्यवहाराची गुरुकिल्ली आहे. - ॲड. अनुजा इंगळे ९८२२६३७५३७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com