

Chhatrapati Sambhajinagar
esakal
जरंडी: महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतील (मनरेगा) पारदर्शकता वाढवण्यासाठी शासनाने मजुरांची उपस्थिती आता ‘फेस रीडिंग’ (चेहरा ओळख प्रणाली) द्वारे नोंदविणे अनिवार्य केले आहे. २९ मार्चपासून हा नवा नियम लागू झाला असून, सोयगाव तालुक्यातही याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र, ग्रामीण भागातील नेटवर्कची समस्या आणि तांत्रिक मर्यादांमुळे या योजनेच्या अंमलबजावणीत अनेक अडथळे निर्माण होत आहेत.