फोटो ओळी BMH26A09923
भूम ः श्री गुरुदेव दत्त हायस्कूलच्या हिंदूराज हराळचा कुस्तीत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल हायस्कूलच्या वतीने सत्कार करण्यात आला.
हिंदूराज हराळची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
भूम : श्री गुरुदेव दत्त हायस्कूलमधील युवा मल्ल हिंदूराज हराळ याने लातूर येथे झालेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत १४ वर्षांखालील ३८ किलो वजन गटात प्रथम क्रमांक पटकावला. या कामगिरीमुळे त्याची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल हायस्कूलच्या वतीने सत्कार करण्यात आला. पोलिस उपअधीक्षक अमोल मोहिते यांच्या हस्ते हिंदूराजचा सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक किरण जाधव यांनी मोहिते यांचा, तर पर्यवेक्षक पोपट बांगर यांनी हेड कॉन्स्टेबल अजित कवडे यांचा सत्कार केला. वस्ताद चाँद सय्यद व धनंजय गाढवे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी मोहिते यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे, वाहतूक नियम व सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले.
.......................
KLL26B10796
कळंब : राजेंद्र बिक्कड यांना शिक्षक भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राजेंद्र बिक्कड यांना ‘शिक्षक भूषण’ पुरस्कार
कळंब : जागतिक शिक्षक दिनानिमित्त ज्येष्ठ सेवा पुरस्कार समिती, कळंब यांच्या वतीने आढाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड यांना ‘शिक्षक भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संत ज्ञानेश्वर बालकाश्रम येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. बिक्कड यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महादेव महाराज आडसूळ होते. यावेळी डॉ. माणिकराव डिकले, बाळासाहेब कथले, डॉ. पुरुषोत्तम पाटील, संभाजी गिड्डे, संतोष भोजने, प्राचार्य काकासाहेब मुंडे, सचिन बोंदर, प्रदीप यादव, अच्युत पौळ, अनिल शेळके, माधवसिंग राजपूत आदी उपस्थित होते.
.................................
MMR26A01908
फोटो ओळ
मुरूम ः तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
प्रतिभा निकेतन संघ तालुक्यात प्रथम
मुरूम : येथील १४ वर्षांखालील मुलांच्या तालुकास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या यशामुळे संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजेत्या संघात अरशू साठे, सर्वेश्वर बेदाडे, फजल शेख, आदर्श गोरे आणि आशुतोष बाबर यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळ व संघभावनेचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघांवर मात केली. या यशासाठी क्रीडा शिक्षक मंडले, सुजित शेळके व प्रा. नारायण सोलकर यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापिका अनुराधा जोशी व माजी प्राचार्य सच्चिदानंद अंबर यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
...........................
NUG26A02277
नळदुर्ग ः पीक कापणी प्रयोग करताना कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी.
पीक कापणी प्रयोगात उत्पादनात मोठी घट
नळदुर्ग : पावसाने पाठ फिरवल्याने नळदुर्ग परिसरातील सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले असून, पीक कापणी प्रयोगातून उत्पादनातील मोठी घट स्पष्ट झाली आहे. सोमवारी (ता. ५) कृषी विभाग व एआयसी पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत दोन ठिकाणी प्रयोग घेण्यात आले. कंदुरमळा येथील मिनहाजबेगम अबूबकर कुरेशी यांच्या शेतातील अर्ध्या गुंठ्याच्या प्रयोगात १ किलो १३५ ग्रॅम सोयाबीन निघाले. त्यानुसार हेक्टरी २ क्विंटल २९ किलो उत्पादन अपेक्षित आहे. पाटील तांडा येथील श्रीधर नरवडे यांच्या शेतात १ किलो ८३५ ग्रॅम उत्पादन मिळाले असून हेक्टरी ३ क्विंटल ६७ किलो उत्पादन अपेक्षित आहे. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
..............................
NUG26A02277
नळदुर्ग ः पीक कापणी प्रयोग करताना कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकरी.
जवाहर महाविद्यालयाचे घवघवीत यश
अणदूर : धाराशिव येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलात झालेल्या आंतरमहाविद्यालयीन मैदानी स्पर्धेत अणदूर येथील जवाहर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. पवन गुंडाप्पा हगलगुंडे याने २०० व ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. अस्मिता कदम हिने थाळीफेकमध्ये सुवर्णपदक, तर भालाफेकमध्ये रौप्यपदक पटकावले. या यशामुळे पवन हगलगुंडे व अस्मिता कदम यांची वैजापूर येथील व्ही. पी. महाविद्यालयात होणाऱ्या केंद्रीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव रामचंद्र आलुरे, प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी, उपप्राचार्य डॉ. मल्लिनाथ लंगडे, क्रीडा विभागप्रमुख डॉ. उमाकांत सलगर, डॉ. नागनाथ कबाडे यांनी अभिनंदन केले.