शंभरदा फोन केला, पाणी मिळेना, रस्त्यात खड्डे; स्टेजवरच बीडच्या खासदारांना तरुणाचा सवाल, माइक हिसकावल्यानं गोंधळ

Beed MP Bajrang Sonawane बीडमध्ये खासदार बजरंग सोनवणे यांना एका कार्यक्रमात तरुणाने माइक हिसकावून घेत पाण्यावरून प्रश्न विचारले. मतदारसंघातील कामांबाबत नाराजीही व्यक्त केली.
Beed MP Bajrang Sonawane

Beed MP Bajrang Sonawane

Esakal

Updated on: 

बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या गेवराईतील एका कार्यक्रमात तरुणाच्या संतापाला सामोरं जावं लागलं. खासदार सोनवणे भाषणासाठी उभा राहण्याआधी एका तरुणानं त्यांच्या हातातला माईक हिसकावला आणि पाण्याच्या प्रश्नावरून जाब विचारला. 'आम्हाला पाण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या. आम्ही तुम्हाला मतदान केलं आहे. आता आमचा प्रश्न सोडवा,' अशी मागणी या तरुणाने केली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...