

Sugarcane Farmers Demand Five Thousand Rupees First Payment as Swabhimani Farmers Protest Amid Drought in Dharashiv
esakal
-दिलीप गंभिरे
कळंब: जिल्ह्यात दुष्काळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना खरीप पिकांनीही साथ सोडली आहे. सोयाबीनसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात रोख उत्पन्नाचे साधन अत्यल्प उरले आहे. अशा परिस्थितीत आर्थिक आधार ठरलेल्या ऊसाला योग्य दर मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून ऊस उत्पादकांना यंदाच्या गळीत हंगामात पहिली उचल प्रतिटन पाच हजार रुपये द्यावी, या मागणीसाठी संघटनेने जिल्हाभर आंदोलन छेडले आहे.