

Spiritual Fervor: Devotees Flock to Mahur Gad During 'Adhik Maas'
Sakal
माहूर : महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावर आज रविवारी (ता.24)अधिक महिन्या निमित्त लेक - जावयासह भाविकांनी श्री रेणुका देवीच्या दर्शना करिता मोठी गर्दी केली आहे. उष्णतेचा पारा प्रचंड चढलेला असतानाही भाविकांनी श्री रेणुका देवी वरील श्रद्धा कायम ठेवत दर्शनासाठी गड सर केला आहे.