

Mandgaon SIR Voter List Dispute 596 Records Face Alleged Errors as Voters Raise Questions Over Family Mapping
sakal
-सुनिल पांढरे
भराडी : सिल्लोड तालुक्यातील मांडगावातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या (एसआयआर) नोंदणी प्रक्रियेत सिल्लोड तालुक्यातील मांडगाव येथे मतदारांच्या नोंदींचा गोंधळ झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावातील एकूण ८०८ मतदारांपैकी तब्बल ५९६ मतदारांच्या नोंदीत विसंगती आढळल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. एका कुटुंबातील सदस्यांची नावे दुसऱ्याच कुटुंबाच्या नोंदीखाली जोडल्याने नागरिकांसमोर आता पुरावे सादर करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.