Gas Cylinder Blast : पुण्यात घरगुत्ती गॅसचा भीषण स्फोट; नंदागौळ येथील तिघांचा मृत्यू, बालिकेसह दोघे जखमी

नंदागौळ येथील रहिवासी असलेल्या एकाच कुटुंबातील पुण्यात घरगुत्ती गॅसगळतीमुळे झालेल्या भीषण स्फोटात तिघांचा दूर्दैवी मृत्यू झाला आहे.
Vishnu Gite, vrundavani gite and pandurang gite

Vishnu Gite, vrundavani gite and pandurang gite

sakal

Updated on

परळी वैजनाथ - पुण्यात घरगुत्ती गॅसगळतीमुळे झालेल्या भीषण स्फोटात तालुक्यातील मौजे नंदागौळ येथील रहिवासी असलेल्या व सध्या पुण्यात खांदवेनगर, खराडी येथे वास्तव्यास असलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा दूर्दैवी मृत्यू झाला आहे. तर यात एका बालिकेसह दोघी जखमी आहेत. या दुर्घटनेमुळे नंदागौळ गावावर शोककळा पसरली आहे तर गीते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com