Parbhani: अडीच वर्षे हरवलेल्या महिलेचा AI ने शोधला पत्ता! ChatGPT आणि Google च्या मदतीने परभणीतील कुटुंबाशी पुनर्भेट

Parbhani Missing Woman: आठवणींमधून मिळालेल्या धाग्यांना AI ची जोड; सिंधुदुर्गातील आश्रमातून 45 वर्षीय जुलेखा शेख अखेर पोहोचल्या आपल्या घरी, मानसिक तणावाच्या अवस्थेत सोडले होते घर
Parbhani Woman Missing for 2.5 Years Reunited With Family Using AI and ChatGPT

Parbhani Woman Missing for 2.5 Years Reunited With Family Using AI and ChatGPT

esakal

Updated on: 

AI Helps Find Missing Woman: अडीच वर्षांपूर्वी अचानक घरातून निघून गेलेली व्यक्ती पुन्हा कधी भेटेल, याची आशाही कुटुंबीयांनी सोडली असेल. मात्र, तंत्रज्ञानाच्या मदतीने हरवलेल्या माणसाचा शोध घेता येऊ शकतो, याचा प्रत्यय महाराष्ट्रात आला आहे. मानसिक तणावाच्या अवस्थेत घर सोडलेल्या 45 वर्षीय जुलेखा मुखीद शेख यांची तब्बल अडीच वर्षांनंतर त्यांच्या कुटुंबीयांशी भेट घडली. विशेष म्हणजे, या शोधमोहिमेत Google Search आणि ChatGPT या AI साधनांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Loading content, please wait...