

Delays and Irregularities Alleged in Nilanga Talathi Office Construction Project
esakal
-राम काळगे
निलंगा : निलंगा तालुक्यामध्ये मंजूर असलेल्या 33 तलाठी कार्यालय बांधकामाचा कार्यारंभ आदेश एकाच ठेकेदाराला दिल्याची बाब उघडकीस आली आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून यामुळे कामाच्या गुणवत्तेवर परिणाम होताना दिसत आहे. शिवाय वर्क ऑर्डर देऊन दोन वर्षे झाले असतानाही अद्याप इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले नसल्याने शासनाने मंजूर केलेल्या कोट्यावधी रुपयाचा विनियोग कधी लागणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकाच ठेकेदाराला तेहतीस तलाठी कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम देण्यात आल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग किती 'मेहरबान' आहे हे यावरून दिसून येते.