

Beed News Sushil Karad Loses Arms License After Viral Revolver Video and Serious Case Registered in Solapur
esakal
बीड: संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा मुलगा सुशील कराड याला प्रशासनाने झटका दिला आहे. सोलापूर येथे सुशील वाल्मिक कराड याच्यासह तिघांविरोधात दाखल झालेला गंभीर गुन्हा आणि यापूर्वी कमरेला शस्त्र लावलेला त्याचा व्हायरल झालेला व्हिडिओ या पार्श्वभूमीवर, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सुशील कराडचा शस्त्र परवाना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.