Bhokardan News : जाळीचादेव घाटात अनोळखी मृत्यूदेह सापडल्याने खळबळ; पोलिस ठाण्याच्या हद्दीच्या वादावरून चार तास मृत्यूदेह होता पडून

जाळीचादेव (ता. भोकरदन ) घाटात डोंगराळ भागात सोमवारी (ता. 10) एक पुरुष जातीचे अनोळखी मृत्यूदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली.
deadbody found
deadbody foundsakal
Updated on

पारध - जाळीचादेव (ता. भोकरदन ) घाटात डोंगराळ भागात सोमवारी (ता. 10) एक पुरुष जातीचे अनोळखी मृत्यूदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली असून, पोलिस ठाण्याच्या हद्दीच्या वादावरून मृत्यूदेह चार तास पडून होता.

याविषयी माहिती अशी की, जाळीचादेव (ता. भोकरदन ) घाटात डोंगराळ भागात जनावरे चारण्यासाठी सकाळी नऊ वाजता काही नागरीक गेले असता, त्यांना एक पुरुषाचा मृत्यूदेह आढळून आला. त्यांनी ही माहिती जाळीचादेव येथील उपसरपंच सुधाकर उदरभरे यांना कळविली.

त्यांनी ही माहिती पारध पोलिसांना दिल्यावरून सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने, जमादार प्रदीप सरडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली असता ही हद्द पारध ठाण्याच्या हद्दीत येत नसल्याचे सांगितले. तर धाड (ता. बुलढाणा )पोलिसांशी संपर्क करून सहायक पोलिस निरीक्षक व कर्मचारी घटनास्थळी आले.

परंतु त्यांनी ही घटना आमच्या हद्दीत घडलेली नसून, फर्दापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे सांगितल्यामुळे तब्बल चार तासानंतर या पोलिसांनी मृत्यूदेहचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी फर्दापूर (ता. सोयगाव )प्राथमिक आरोग्य केंद्रात केला आहे.परंतु मृत्यूदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून, कोणाचा आहे..?

याला कोणी मारले..? हे अद्याप अस्पष्ट आहे. यामुळे मात्र परिसरात खळबळ उडाली आहे.

जाळीचादेव डोंगर परिसरात सापडलेला अनोळखी कोणीतरी खून करून त्याचा मृत्यूदेह या ठिकाणी आणून टाकला असल्याचा अंदाज पारध पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com