Water Crisis News: अजिंठा-अंधारी प्रकल्पात पाणीपातळी घसरली; शिवना-मादणी गावांचा पाणीपुरवठा ठप्प, पावसाची प्रतीक्षा

अजिंठा-अंधारी प्रकल्पातील पाणीपातळी घसरल्याने शिवना-मादणीसह डोंगरपट्ट्यातील गावांचा पाणीपुरवठा ठप्प; उघडा पडलेल्या पंपिंग व्हॉल्वमुळे जॅकवेलपर्यंत पाणीच पोहोचत नाही
Residents are facing a drinking water crisis as the joint rural water supply scheme remains affected until the reservoir receives adequate rainfall.

Residents are facing a drinking water crisis as the joint rural water supply scheme remains affected until the reservoir receives adequate rainfall.

Sakal

Updated on

शिवना : सिल्लोड तालुक्यातील अजिंठा- अंधारी मध्यम प्रकल्पातील पाणी साठा संपत आल्याने शिवना- मादणी गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या संयुक्त पाणी पुरवठा योजनेच्या इंटेक्स वेलचा पाणी उपसा करणारा पंपिंग व्हॉल्व उघडा पडला आहे. त्यामुळे धरणाच्या मधोमध उभारलेल्या जॅक वेल मध्ये पाणी पोहचत नाहीये. येथुन हे पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पात पोचते व नंतर गावांतर्गत जलवाहिनीद्वारे गावात पाणी पुरवठा केला जातो. मात्र, पाणीपातळी खालावल्यामुळे या दोन्ही गावचा पाणी पुरवठा बंद झाल्याने ऐन पावसाळ्यात येथिल नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com