manoj jarange patil, devendra fadnavis and eknath shinde
sakal
अंकुशनगर - मराठा आरक्षण आंदोलन बदनाम करण्यासाठी आणि आंदोलन बंद पाडण्यासाठी आपल्याला ५०० कोटी रुपये दिल्याचा आरोप पुढे करून कट रचण्यात आल्याचा दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. या प्रकरणाचा सखोल तपास होऊन सत्य बाहेर आले पाहिजे. ५०० कोटी रुपयांचा विषय आपण संपवणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. या प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालावे, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हस्तक्षेप करावा, अशी मागणी जरांगे यांनी शनिवारी अंकुशनगर येथील निवासस्थानी पत्रकार परिषदेत केली.