मुंबई : मुंबईतील आरे प्रशासनाच्या हद्दीत राहणाऱ्या आदिवासी आणि झोपडपट्टीवासीयांच्या हक्काच्या पाण्याचा प्रश्न अखेर सुटण्याच्या मार्गावर आहे. 'पाणी हक्क समिती'च्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या धडक मोर्चामुळे प्रशासनाला नमते घ्यावे लागले असून, जलजोडणीसाठी आवश्यक असलेले 'ना हरकत प्रमाणपत्र' ( एन ओ सी ) देण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. येत्या २३ मार्च रोजी यासंदर्भात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.