दिल्लीहून परतताच शेलार राज ठाकरेंच्या भेटीला, मुंबईत घडामोडींना वेग

ashish shelar meets raj thackeray
ashish shelar meets raj thackeray

महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राजकारण चांगलंच पेटलं आहे. भाजपने धनंजय महाडिकांना मैदानात उतरवल्यानंतर चुरस वाढली आहे. सध्या मविआ आणि भाजपचे सर्व आमदार विविध ठिकाणी रिसॉर्ट्सवर दाखल झाले आहेत. एकही मत फुटू नये यासाठी सर्व पक्ष काळजी घेत आहेत. मात्र, यादरम्यान भाजपने वेगळी खेळी खेळायला सुरुवात केली आहे. (Rajyasabha Election 2022)

देवेंद्र फडणवीस यांना कोरोना झाल्याने त्यांच्या फिरण्यावर बंधनं आल्याने भाजपच्या वतीने प्रसाद लाड यांना मुंबईतील आमदारांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर गिरीष महाजन यांच्यावर उर्वरित राज्यातील आमदारांना गळाला लावण्याची जबाबदारी आहे. महाजन यांनी तत्काळ पालघरच्या हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. त्यामुळे भाजपसाठी संकटमोचन होण्याचं काम ते करत आहेत. (Ashish Shelar Meets Raj Thackeray)

दरम्यान, आशिष शेलार तातडीने दिल्लीला रवाना झाले. यानंतर त्यांनी मुंबईत येऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. आज सकाळीच ते राज ठाकरे यांच्या 'शिवतिर्थ' बंगल्यावर दाखल झाले.

राज ठाकरे यांच्या पक्षाचा एकमेव आमदार आहे. कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले. अद्याप मनसेच्य़ा मतासाठी त्यांना महाविकास आघाडीकडून कोणीही संपर्क केला नव्हता. त्यामुळे भाजपने संधी साधत मनसेचं एकमेव मत स्वतकडे ओढून घेतलंय.

अलिकडच्या काळात मनसे आणि भाजपमध्ये हिंदूत्वावरून बैठका वाढल्या आहेत. येणाऱ्या निवडणुका दोन्ही पक्ष सोबत लढण्याची शक्यता आहे. मनसेचा प्रभाव असणाऱ्या महापालिका प्रभागांमध्ये भाजपकडून साटंलोटं होण्याची शक्यता आहे.

मनसेचं एकमेव मत भाजपच्या धनंजय महाडिक यांना द्यावं, म्हणून भाजपतर्फे प्रयत्न सुरू आहेत यासाठी आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com