Rajyasabha Election 2022 | राज्यसभेसाठी भाजपने पहिला डाव टाकला, केंद्रीय मंत्री फडणवीसांच्या भेटीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amit shah and fadnavis

राज्यसभेसाठी भाजपने पहिला डाव टाकला, केंद्रीय मंत्री मुंबईत

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत बैठकांना वेग आला आहे. राज्यसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत संपली. त्यानंतर आता निवडणूक होणार, हे देखील स्पष्ट झालं. त्यामुळे आमदारांना स्वत:कडे वळवण्यासाठी खलबतं सुरू झाली आहेत. (Devendra Fadnavis News)

महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलं होतं. मात्र फडणवीसांनी काऊंटर ऑफर दिल्याने ही बोलणी फिस्कटली. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने विविध मंत्र्यांवर स्थानिक पातळीवर जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. यासाठी दिल्लीतून सेटिंग लावण्याचं काम सुरू आहे. यासाठी केंद्रातून मंत्री मुंबईत दाखल झाले आहेत. (Rajyasabha Election 2022)

राज्यसभेची रणनीती ठरवण्यासाठी राज्यसभा निवडणूक प्रभारी अश्विनीकुमार वैष्णव आज मुंबईत दाखल होणार आहेत. दुपारी चार वाजता देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवास्थानी आढावा बैठक पार पडणार होती. मात्र फडणवीस यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आता त्यांच्या बंगल्यावर बैठक होणार नाहीय. तरीही फडणवीस ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत.

भाजपा प्रदेश कार्यालयात अश्विनीकुमार वैष्णव, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. यानंतर दुसरी बैठक होईल. या बैठकीसाठी गिरीश महाजन, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय उपस्थित राहणार आहेत. या बैठकीतही देवेंद्र फडणवीस ऑनलाइन पद्धतीने हजेरी लावतील.

सहा जागा... सात उमेदवार.... आणि घोडेबाजार!

महाराष्ट्रातील सहा जागांसाठी एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत. भाजपने सातवा उमेदवार देऊन निवडणुकीत चुरस वाढवली आहे. मात्र यामुळे घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. अपक्ष आमदारांच्या मतांवर दिल्लीचा मार्ग ठरणार असल्याने राज्यात घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या अपक्ष आमदारांसोबत बैठक घेणार आहेत. ८ ते १० जून दरम्यान मतं फूटू नये यासाठी मविआ सरकार आमदारांना हॉटेलवर ठेवणार असल्याचं समजतंय. मात्र त्याआधीच केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव मुंबईत दाखल होणार आहे.

Web Title: Minister Ashwini Vaishnav Meets Devendra Fadnavis Over Rajyasbaha Election 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Devendra Fadnavis
go to top