'BDD' प्रकल्पाच्या बांधकामाचा नारळ फुटणार, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

bdd chawl
bdd chawlsakal media

मुंबई : वरळी बीडीडी चाळ (worli bdd chaul inauguration) पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा (redevelopment ) शुभारंभ रविवारी (ता. 1) दुपारी 12 वाजता जांबोरी मैदान वरळी येथे आयोजित करण्यात आला आहे. बांधकामाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav Thackeray) यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले असून याप्रसंगी खासदार शरद पवार (sharad pawar) आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांच्यासह मंत्रिमंडळातील नेते उपस्थितीत राहणार आहेत. या कार्यक्रमाची जोरदार तयारी शिवसेनेने (shivsena) केली असून महाविकास आघाडीच्या (mva government) नेत्यांच्य फोटोसह वचनपूर्तीचे बॅनर ठिकठिकाणी झळकले आहेत. (BDD chaul building constructions inauguration on sunday by cm uddhav Thackeray -nss91)

bdd chawl
संस्काराच्या शिदोरीतील गुणदर्शन; ...पण चिमुकल्याला वाचवला!

वरळी, नायगाव, ना.म.जोशी मार्गावरील बीडीडी चाळींचा भूमिपूजन सोहळा 22 एप्रिल 2017 रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वरळी येथील जांबोरी मैदानात झाला होता. या प्रकल्पासाठी सरकारने नोडल एजन्सी म्हणून म्हाडाची नेमणूक केली आहे. या प्रकल्पासाठी म्हाडाने बांधकामासाठी कंत्राटदारांची नेमणूक केली असून प्रकल्पाचे काम सुरु करण्यास महाविकास आघाडीतील नेत्यांना वेळ मिळाला नव्हता. अखेर 27 जुलैला वरळी पुनर्विकासाच्या बांधकामाच्या इमारतीचा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता. या दरम्यान राज्यात पावसाने धुमाकूळ घातल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ पुढे ढकलण्यात आले होते. पाच दिवसांनंतर सरकारने या प्रकल्पाचा शुभारंभ जांबोरी मैदानात आयोजित करण्यात आला आहे.

वरळी जांबोरी मैदानात भव्य तंबू उभारण्यात आला आहे. या ठिकाणी हा सोहळा पार पडणार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेते याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आखून दिलेल्या नियमावलीनुसार या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याचा दावा सरकारने केला आहे. तसेच या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण http://mhada.gov.in या संकेत स्थळावरून केले जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com