ब्लुटूथ हेडसेट लावून चालत असल्यानं तरुणाला बेदम मारहाण, पत्नीच्या पोटावरही लाथ मारली; भिवंडीतली घटना

Bhiwandi Crime: भिवंडीत ब्लुटूथ हेडसेट लावून चालणाऱ्या तरुणाला चौघांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Bhiwandi Crime

Bhiwandi Crime

ESakal

Updated on: 

भिवंडी : ब्ल्यूटूथ हेडसेट लावून चालत असल्याच्या कारणावरून चार जणांनी एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना भिवंडीतील कसाईवाडा परिसरात घडली आहे. हल्लेखोरांनी लाथा बुक्क्यांसह लाकडी वस्तूने मारहाण करून तरुणाला जखमी केले. पतीला वाचवण्यासाठी आलेल्या पत्नीच्या पोटातही लाथ मारण्यात आली. त्यानंतर चाकू दाखवून संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी निजामपुरा पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...