ठाणे जिल्ह्याचा पाणी प्रश्न सुटणार, दोन नवी धरणे होणार; मंत्री गणेश नाईक यांची घोषणा

Thane Water Scarcity: ठाणे जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी दोन नव्या धरणांची घोषणा करण्यात आली आहे. २०३१ पर्यंत पाणी उपलब्ध होईल, अशी माहिती मंत्री गणेश नाईक यांनी दिली.
Ganesh Naik

Ganesh Naik

Esakal

Updated on: 

मुंबई : गेल्या काही वर्षांत ठाणे शहराचा विस्तार झपाट्याने झाला आहे. विशेषतः घोडबंदर रोड परिसरात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभारले असून लोकवस्तीमध्येही मोठी वाढ झाली आहे. मात्र ठाणे शहराच्या वेगाने वाढणाऱ्या शहरीकरणाला पाणीपुरवठ्याचे नियोजन पुरेसे ठरत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ठाण्यात एकीकडे शहरात मोठमोठी गृहसंकुले उभी राहत असताना दुसरीकडे नागरिकांना पिण्याच्या आणि दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.

Loading content, please wait...