

Central Railway Plans Bigger Nagpur–Pune Vande Bharat; Waiting List Relief Expected
esakal
-नितीन बिनेकर
मुंबई : अवघ्या काही महिन्यांत प्रवाशांची पसंती मिळविलेल्या नागपूर (अजनी)-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसच्या क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. सध्या ८ डब्यांसह धावणाऱ्या या गाडीसाठी १६ किंवा २० डब्यांचा नवीन रेक उपलब्ध करून देण्याची तयारी मध्य रेल्वेने सुरू केली आहे. नवीन रेक मिळाल्यानंतर ही गाडी वाढीव डब्यांसह धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'दैनिक सकाळ'ला दिली.