

Grocery Price Hike
ESakal
वाशी : दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईचा फटका आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराला बसत असून, गृहिणींचे बजेट पार कोलमडले आहे. इंधन दरवाढ, वाहतूक खर्चातील वाढ, कच्च्या मालाची आवक आणि बाजारातील वाढती मागणी यामुळे गेल्या सहा महिन्यांत किराणा वस्तूंच्या भावात ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.