

Mill Workers Mumbai Houses
ESakal
मुंबई : गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळावी, अशी आग्रही मागणी असतानाही राज्य सरकारने अनेक कामगारांना शेलू येथील घरांसाठी राजी केले आहे. त्याला कामगारांनीही सकारात्मक प्रतिसाद दिलेला असतानाच राज्य सरकारने आता पुन्हा गिरणी कामगारांना मुंबईत घरे देण्याबाबतचे विविध पर्याय तपासण्यासाठी समिती नेमली आहे. त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा गिरणी कामगारांना मुंबईतील घरांचे गाजर दाखवले असल्याचा आरोप गिरणी कामगार कृती संघटनेने केला आहे. तसेच शेलू येथील घरांसाठी तयार झालेल्या कामगारांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचे म्हटले आहे.