मुंबई
Mumbai Local: नवीन वेळापत्रकामुळे रेल्वे प्रवाशांची दाणादाण!
Mumbai Local Latest News: कर्जत, कसाऱ्याला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसणार असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
Railway News: मध्य रेल्वेने उपनगरी लोकलचे नवीन वेळापत्रक शनिवारपासून लागू केले आहे. शनिवारी पहिल्याच दिवशी प्रवाशांचा गोंधळ उडाला. विशेषतः सीएसएमटीवरून सुटणाऱ्या शेवटच्या कर्जत लोकलची वेळ १२ मिनिटे, तर कसारा लोकलची वेळ सहा मिनिटे अलीकडे आणली आहे.
त्यामुळे प्रवाशांची ही नवी वेळ गाठताना काही प्रमाणात धावपळ झाली. पनवेलवरून सुटणारी शेवटची लोकल पकडून कुर्य्यातून कर्जत, कसाऱ्याला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसणार असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

