Mumbai News : मुंबईत आंदोलन ठाकरेंच्या शिवसेनेचे; संरक्षण मोदींच्या छायाचित्राला!

Mumbai News
Mumbai News

मुंबई : मुंबई पालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने महानगरपालिकेवर धडक मोर्चा काढला. मात्र या मोर्चादरम्यान शिवसैनिकांचा राग जी २० परिषदेच्या पोस्टरवर असलेल्या पंतप्रधानाच्या फोटोवर निघत होता. त्यामुळे मोदींच्या ठिकठिकाणच्या पोस्टरवर पोलिसांचा पहारा होता.त्यामुळे आंदोलनापेक्षा पोलिसाचे लक्ष मोदींच्या फोटोवर असल्याचे चित्र होते.

Mumbai News
Buldana Bus Accident : मृत काळेंच्या कुटुंबांचा शोध घेताना पोलिसही थकले! घरमालकाचाही पत्ता...

शनिवारी मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानापर्यंत शिवसेना ठाकरे गटाचा मोर्चा निघाला. भर पावसात निघालेल्या या मोर्चात कट्टर शिवसैनिक आणि रेनकोट आणि छत्र्यासह सामील झालेल्या महिलांची संख्या उल्लेखनीय होती.

या मोर्चावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. या दरम्यान मेट्रो टॉकीज ते पालिकेकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी लागलेल्या जी २० च्या पोस्टर आणि त्यावर असलेले पंतप्रधानाच्या छायाचित्रावर शिवसैनिकांनी राग काढत फाडण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या हे लक्षात येताच प्रत्येक जी 20 परिषदेच्या पोस्टरपुढे पोलीस तैनात करण्यात आले.

Mumbai News
Buldhana Bus Accident: महामार्ग नव्हे मृत्यूमार्ग; ‘समृद्धी’वर अपघातांचं सत्र सुरूच

पावसात भगव्या छत्र्या

पावसातही मोर्चामध्ये शिवसैनिक छत्र्या आणि रेंन कोर्ट परिधान करून सहभागी झाले होते. शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे

विरारवरून एक चार वर्षांच्या समर्थ अदावळे बाळ शिवसैनिक सायकलवरून मोर्चात सहभागी झाला होता. समर्थ आपल्या आई-वडिलांबरोबर सहभागी झाल्या होता. तर कट्टर शिवसैनिक दत्ता पडवळकर आपली भगवी सायकल आणि भगव्या कपडे परिधान करून ह्या विराट मोर्चात सहभागी झाला होता. हे दोघी या मार्चचे विशेष आकर्षण राहिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com