MNS Leader Raju Patil
sakal
डोंबिवली - शास्त्रीनगर महापालिका रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. मनसे नेते राजू पाटील यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन रुग्णालयातील सुविधा आणि आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर जोरदार टीका करत शहरातील आरोग्य व्यवस्थेच्या दुर्दशेसाठी सत्ताधाऱ्यांनाच जबाबदार धरले.