Mumbai Railway : धक्कादायक! रेल्वेच्या पॅन्ट्री कारमध्ये उंदरांचा सुळसुळाट! एक्सप्रेसमधील व्हिडीओ व्हायरल

दरवर्षी उंदीरांचा नायलाटासाठी भारतीय रेल्वेकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, उंदरांचा उद्रेक कमी होण्याऐवजी वाढत जात आहे.
mouse in railway pantry car
mouse in railway pantry carsakal
Updated on

मुंबई - दरवर्षी उंदीरांचा नायलाटासाठी भारतीय रेल्वेकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, उंदरांचा उद्रेक कमी होण्याऐवजी वाढत जात आहे. आत तर चक्क मेल - एक्सप्रेसच्या पेट्री डब्यात उंदरांचा सुळसुळाट झाल्याने प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

नुकताच एलटीटी-मडगाव एक्सप्रेसच्या पॅन्ट्री कारमध्ये अन्नपदार्थ ठेवलेल्या भांड्यांमधील अन्न खात असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. त्यामुळे आयआरसीटीसी आणि रेल्वे प्रशासनाचा कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थिती केले जाते आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव एक्सप्रेस गाडीच्या पॅन्ट्री कारमध्ये अन्नपदार्थ ठेवलेल्या भांड्यांवर चढून उंदीर त्यामधील अन्न खात आहेत. त्याबाबतचा व्हिडिओ प्रवाशांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ समाजमाध्यमावर तुफान व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ व्हायरल होताच आयआरसीटीसीकडून सारवासारव केली जात असून लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये उंदरांचा मोठा वावार असल्यानेच अशी घटना घडल्याचा दावा केला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये उंदरांचा सुळसुळाट झाला आहे.

त्यामुळे पॅन्ट्री कारमध्ये त्यांचा शिरकाव होत असल्याची तक्रार आयआरसीटीसीने रेल्वेकडे करत त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मध्य रेल्वे येथे पेस्ट कंट्रोलबरोबरच इतर प्रकारच्या उपाययोजना करणार असल्याचे मध्य रेल्वने स्पष्ट केले आहे.

रेल्वे दरवर्षी सुमारे कोट्यवधी रुपये खर्च फक्त उंदीर मारायला करतात. मात्र, कायमचा उंदीरांचा नायलाट होत नाही. भारतीय रेल्वेने गेल्या पाच वर्षात ६२ हजारपेक्षा जास्त उंदीर मारले असून २३ कोटीपेक्षा जास्त रुपये खर्च केला आहे. तरीही उंदरांचा बंदोबस्त करण्यात रेल्वेला अपयश येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com