Rewas–Karanja Sea Bridge: रेवस-करंजा समुद्री पुलामुळे मुंबई ते अलिबाग प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत होण्याची शक्यता आहे. ४५ मीटर उंच पुलाचे काम नोव्हेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
मुंबई : मुंबईहून अलिबागला पोहोचण्यासाठी सध्या तीन ते चार तासांचा प्रवास करावा लागतो. मात्र, रेवस-करंजा समुद्री पुलाची उभारणी पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.