esakal | ओपनहार्ट सर्जरीवरुन वाजेचा डॉक्टरांबरोबर वाद
sakal

बोलून बातमी शोधा

sachin-waze 2.jpg

ओपनहार्ट सर्जरीवरुन वाजेचा डॉक्टरांबरोबर वाद

sakal_logo
By
सुरज सावंत

मुंबई: अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मन्सुख हिरेन हत्या प्रकरणात (Mansukh hiren death case) तुरुंगात असलेला बर्खास्त पोलीस निरीक्षक सचिन वाजेने (Sachin waze) न्यायालयात रुग्णालय बदलण्यासाठी अर्ज केला आहे. ह्रदय विकाराचा (Heart disease) त्रास असल्याने सचिन वाजेला भिवंडीच्या (bhiwandi) सुराना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या ह्रदयात पाच ठिकाणी ब्लॉकेज दाखवण्यात आले आहेत. त्यातील ३ ब्लॉक हे ९०% च्या आसपास आहेत.

सचिन वाजेवर अँन्जोप्लास्टि करण्यासंदर्भात डॉक्टरांचा सल्ला असून वाजे मात्र ओपनहार्ट सर्जरी करण्यावर ठाम असल्याचे कळते. त्यामुळेच डॉक्टरांनी उपचारासाठी नकार दिल्याने वाजेने न्यायालयात रुग्णालय बदलीसाठी अर्ज केला आहे. वाजेने बॉम्बे हॉस्पिटल व वोक्हार्ड हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यास परवानगी मिळावी म्हणून अर्ज केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: ब्रेकआउटनंतर RIL चे शेअर्स वाढले, लवकरच 3000 रुपयांची पातळी गाठण्याची शक्यता

मागच्या महिन्यात न्यायालयात झालेल्या सुनावणीच्यावेळी सचिन वाजेवर ह्दय शस्त्रक्रिया (heart surgery) करणं आवश्यक असल्याचं त्याच्या वकिलांनी कोर्टात सांगितलं होतं. सचिन वाजेच्या (sachin waze case) ह्रदयात ३ ब्लॉक आहेत. जे ९० % हून अधिक आहेत. सचिन वाजेच्या वकिलांनी कोकीळाबेन, (kokilaben hospital) सुराना किंवा सैफी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यास परवानगी द्यावी अशी न्यायालयाकडे विनंती केली होती.

loading image
go to top