esakal | RILचे शेअर्स घ्यायचा विचार करताय? जाणून घ्या काय आहे तज्ज्ञाचे मत
sakal

बोलून बातमी शोधा

RILचे शेअर्स घ्यायचा विचार करताय? जाणून घ्या काय आहे तज्ज्ञाचे मत

RILचे शेअर्स घ्यायचा विचार करताय? जाणून घ्या काय आहे तज्ज्ञाचे मत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

- शिल्पा गुजर

तुमच्याकडे रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. शेअर्स असतील तर कधीपर्यंत होल्ड करावेत ? नसतील तर खरेदी करावेत का ? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगत आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे (RIL) शेअर्स मंगळवारीही वाढत राहिले. सुरुवातीच्या व्यापारात त्याने प्रति शेअर 2,477.4 रुपयांचा उच्चांक गाठला. कंपनीचा शेअर 3 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. यापूर्वी रिलायन्सचा शेअरही शुक्रवारी आणि सोमवारीही वाढला होता. तो आणखी वाढेल अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

हेही वाचा: Pitru Paksha 2021 : कधी सुरू होतोय पितृपक्ष?

कंपनीच्या शेअर्सने एका वर्षाच्या कंसॉलिडेशननंतर नवीन ब्रेकआउट केले आहे. पुढील 9-12 महिन्यांत हे शेअर्स 3,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स वाढल्यानंतर निफ्टीनेही 17,500 अंकांची पातळी गाठली आहे. कंपनीच्या शेअरमध्ये ब्रेकआउट झाल्यानंतर आणखी तेजी येण्याची मोठी शक्यता आहे. या स्टॉकची पुढची पातळी 2,500 रुपयांवर आहे.गुंतवणूकदारांनी रिलायन्सच इंडस्ट्रीजचे स्टॉक्स 2,600 रुपयांच्या पुढच्या टारगेटसाठी ठेवावा असे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: हरतालिका व्रतात 'या' चुका टाळा, अन्यथा किंमत मोजावी लागेल!

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी नुकतेच परवडणाऱ्या ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली. याशिवाय, जिओची सरासरी कमाई प्रति वापरकर्ता (ARPU)वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिओचे मूल्यांकन वाढेल.

सौदी अराम्को सोबतच रिलायन्सची जिल सुद्धा पुढे जात आहे. त्यामुळेही कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत वाढ झाली आहे आणि पुढील 9 ते 12 महिने या वाढीत सातत्य राहिल.

loading image
go to top