

Mumbai
esakal
विरार: मुंबईला गुजरात तसेच उत्तर भारताशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील खानिवडे येथील तानसा नदीवरील ६५ वर्षे जुन्या पुलाच्या दुरुस्तीचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या चार महिन्यांपासून या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्याने कशीद, कोपर, खराटतारा आणि खानिवडे परिसरातील नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे.