कर भरणे ही समाजसेवाच!

कर भरणे ही समाजसेवाच!
Published on

कर भरणे ही समाजसेवाच!
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे मत
मुंबई, ता. १० : ‘प्रामाणिकपणे कर भरणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. ही एकप्रकारे समाजसेवाच असून, सर्वांनी कर भरलाच पाहिजे. आपण कर भरला नाही, तर सीमेवरील जवानांची काळजी घेता येणार नाही, रस्ते-महामार्ग बांधता येणार नाहीत,’ असे मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी गुरुवारी येथे व्‍यक्त केले.

महावीर जयंतीनिमित्त गुरुवारी (ता. १०) भारत जैन महामंडळ या संस्थेतर्फे योगी सभागृहात झालेल्या ‘महावीर स्वामी जन्म कल्याणक’ महोत्सवाला राज्यपाल राधाकृष्णन यांची प्रमुख उपस्थिती होती. त्या वेळी ते बोलत होते.

राज्यपाल पुढे म्हणाले, ‘मृत्यू अटळ आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. भौतिक सुखाला कधीही सीमा नसते. कितीही पैसे कमवा, घरे बांधा, बँक ठेवी जमा करा. त्यामुळे समाधान होणार नाही. जीवन समाजासाठी आणि लोकसेवेसाठी व्यतीत केले पाहिजे.’

या वेळी आचार्य नयपद्मसागर यांनी मुंबईतील १५०० सार्वजनिक शाळांना नवसंजीवनी देऊन तेथील लाखो गरीब मुलांना मोफत भोजन, शिक्षण, कौशल्य शिक्षण व संस्कार देण्याचा संकल्प सोडला.
या वेळी राज्यपालांच्या हस्ते भारत जैन महामंडळ संस्थेच्या १२५व्या वर्धापनदिनानिमित्त काढलेला ‘जैन जगत’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला जैन साध्वी प्रियंवदा, राज्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार मिलिंद देवरा, जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, भारत जैन महामंडळ संस्थेचे अध्यक्ष सी. सी. डांगी, माजी अध्यक्ष तसेच जैन समाजातील मान्यवर उपस्थित होते.
----
शाकाहारामुळे विचार परिवर्तन!
जैन धर्मात शाकाहारी जीवनपद्धतीला महत्त्व आहे. शाकाहारी भोजनामुळे मनुष्याचे विचार परिवर्तन होते असा आपला अनुभव आहे. २००० मध्ये संपूर्ण शाकाहार स्वीकारल्यानंतर आपल्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडले, असे राज्यपाल म्हणाले. एके काळी तमिळनाडू राज्यातील दोन-तृतीयांश लोक भगवान महावीरांची शिकवण पाळत होते. तमिळ भाषेतील पाच महाकाव्यांपैकी दोन महाकाव्ये जैन मुनींनी लिहिली आहेत. जैन धर्माचा देशाच्या जनमानसावर मोठा प्रभाव आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com