

Nanded Road Potholes
esakal
नांदेड: शहरातील वर्दळीच्या बर्की चौक ते सराफा परिसरातील मूलभूत सुविधांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून रस्ते, नाल्या, कचरा आणि पथदिव्यांच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर झाली असून रस्त्यांवर पाणी, चिखल आणि कचरा साचत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.